तुळसमधील 450 शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरे – शैक्षणिक साहित्य वाटप..
वेंगुर्ला
सोमवार दि. 15 जून रोजी शाळेचा नवीन हंगाम 2026-2027 सुरू झाला. यानिमित्त जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातही प्रत्येक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस ग्रामपंचायत उपसरपंच तथा भाजपचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरेश नाईक यांच्यामार्फत तुळस गावातील जि. प. प्राथमिक शाळांमधील 450 विद्यार्थ्यांना मोफत दप्तरे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे. वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळस गावातील 9 प्राथमिक शाळा, 1 हायस्कूल व 10 अंगणवाड्या यामध्ये तसेच अन्य शाळांमध्ये जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरे तसेच शैक्षणिक साहित्यही वाटप करण्यात आले. यामध्ये तुळस येथील गिरोबा विद्यालय, श्री जैतिर विद्यालय तुळस, स्वामी विवेकानंद विद्यालय, शारदा विद्यालय, वेताळ विद्यालय, वडखोल विद्यालय, पाचतळी विद्यालय, रेवटी विद्यालय, पलतड विद्यालय इत्यादी 9 जि. प. प्राथमिक शाळांमध्ये, तसेच श्री शिवाजी हायस्कूल तुळस व एकूण 10 अंगणवाड्यांमध्ये हे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आले. तसेच वजराट शाळा नं 1 येथेही त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी रामचंद्र परब, विद्याधर माळकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार ,जयवंत तुळसकर ,नारायण कोचरेकर, सावंत आदी तसेच संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमासाठी यशोदा साळगावकर आणि प्रणाली साळगावकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे सचिन नाईक यांनी स्पष्ट केले.
