Headlines

वेंगुर्ला मठ मार्गांवरील काम बंद का…? वाहनधारकांचा सवाल…

पावसाळा नसूनही योग्य रोलिंग न झाल्याने होणार समस्या…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी/ कुडाळ हा मुख्य मार्ग असून मठ टाकयेवाडी – मठ गावठणवाडी – मठ कुडाळतिठा या मुख्य रस्त्याचे साईडपट्टी चे काम संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान गेला आठवडा पाऊस नसल्याने मुख्य रोलिंग चे काम आवश्यक असूनही संबंधित विभागामार्फत हे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल वाहनधारक तसेच नागरिकांतून करण्यात आला आहे. या एका बाजूच्या साईडपट्टी भरावाचे काम ठेकेदाराने चांगले केले आहे, तरीही गेल्या आठवड्यात पाऊस नसूनही मुख्य बऱ्याच ठिकाणी रोलिंगचे काम अर्धवट असून ते पावसाळ्यापूर्वी झाल्यास वाहनधारकांच्या दृष्टीने योग्यतेचे ठरू शकते. बऱ्याच ठिकाणी मातीचा भराव बसला असून, काही भागात टाकण्यात आलेल्या बोल्डरवर योग्य प्रकारे रोलिंग होणे आवश्यक असताना संबंधित विभागाने हे काम पाऊस नसूनही अपूर्ण ठेवल्याने पावसाळा हंगामात वाहनधारकांना याचा निश्चितच फटका बसू शकतो. या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या मठ येथील भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांनीही गेले चार दिवस याबाबतीत दुर्लक्ष केल्याने वाहनधारकातून एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य पद्धतीने आवश्यक ठिकाणी मजबुतीकरण व योग्य प्रकारे रोलिंग व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मठ संपूर्ण कार्यक्षेत्रात गटारांची अवस्था पाहता मुख्य मार्ग असल्याने व वाहनाची मोठी ये जा होत असल्याने गटारातील फलक सुस्थितीत करण्यात यावेत, केवळ मलमपट्टी व किरकोळ काम न करता नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने गटार स्वच्छता, गटारातील झाडी उचलणे याकडे अजित नाईक यांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे. बहुतांशी भागात पाण्याचा योग्य प्रकारे वापर न झाल्याने बऱ्याच भागात भराव खचला आहे. याबाबत तातडीने लक्ष पुरविण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे. मठ मठकरवाडी येथील कामाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page