Headlines

नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी यांच्याकडून झिरंगवाडी शाळेत वह्यांचे वाटप..

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वॉटर प्युरिफायरही देण्याची ग्वाही..

⚡​सावंतवाडी ता.१७-:
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनातर्फे झिरंगवाडी शाळा नंबर ७ मध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले होते. शासनाकडून हे सर्व साहित्य मिळत असले, तरी विद्यार्थ्यांना वह्यांची भासणारी गरज ओळखून शिवसेनेच्या नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी यांनी सामाजिक जाणीवेतून पुढाकार घेतला आहे. शाळेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप केले.
​विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने, शाळेत लवकरच वॉटर प्युरिफायर बसवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देखील यावेळी नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी यांनी दिली. त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
​या वेळी मुख्याध्यापिका ऐश्वर्या सावंत, शिक्षिका संध्या बिबवनेकर, सुरेखा परब यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. शाळेच्या वतीने अ‍ॅड. सायली दुभाषी यांच्या या उपक्रमाबद्दल विशेष आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page