Headlines

डॉ. सुधीर शिवेश्वरकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

*⚡मालवण ता.२७-:* ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे तर्फे दिला जाणारा या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. सुधीर शिवेश्वरकर यांना प्रा. चंद्रशेखर हडप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा मानून अहोरात्र कार्य करणारे डॉ. शिवेश्वरकर याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वार हडप यांनी येथे काढले. आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) आचरा पंचक्रोशी या…

Read More

साने गुरुजी वाचन मंदिरात पुस्तक प्रदर्शन संपन्न

मालवण ता.२७-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचनालयासाठी नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मालवणातील लेखिका मेघना जोशी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर गोसावी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेघना जोशी यांनी…

Read More

भरड येथे स्वामी समर्थ पुण्यतिथी कार्यक्रम

मालवण ता.२७-:* मालवण भरड वायरी रोड येथील मुणगेकर यांच्या निवासस्थानी दि. २८ एप्रिल रोजी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ६.३० वाजता दुग्धभिषेक, सकाळी ७ ते १२ यावेळेत समर्थांचे पूजन, दु. १२.३० वा. आरती, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. तिर्थप्रसाद, सायं. ५.३० वा. संगीत गायनाचा कार्यक्रम,…

Read More

धुरीवाडा स्वामी समर्थ मठात पुण्यतिथी कार्यक्रम

मालवण ता.२७-:* मालवण धुरीवाडा कुरण येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात २८ एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. २७ रोजी सकाळी ७ ते २८ रोजी सकाळी ७ पर्यंत अखंड नामस्मरण (नामस्मरणात सहभागी होणाऱ्यांची निवास, भोजनाची सोय करण्यात येईल.) २८ रोजी सकाळी ७.३० ते ९ वा. काकड आरती, भूपाळ्या, अभिषेक, पूजन, ९…

Read More

घुमडे घुमडाई मंदिरात ५ रोजी डबलबारी

मालवण ता.२७-:* घुमडे येथील देवी घुमडाई मंदिर वर्धापन दिनानिमित्त ५ मे रोजी रात्री ९ वाजता घुमडाई मंदिर येथे डबलबारी भजन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना ब्राह्मणदेव भजन मंडळ, कातवडचे बुवा मंगेश नलावडे (पखवाज-गौरव (राजा) चव्हाण, तबला-मनीष डिकवलकर) व कुलस्वामिनी भजन मंडळ, आनंदव्हाळ घाडीवाडीचे बुवा विद्देश घाडीगावकर (पखवाज-मनीष घाडीगावकर, तबला रामचंद्र (ताला) मेस्त्री) यांच्यात…

Read More

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमात सहभागी होऊन यथाशक्ती सहकार्य करा…

हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे आवाहन सावंतवाडी ता.२७-:* हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्गच्या वतीने देऊ मायेचा हात, उचलू दुःखाचा भार या उक्तीप्रमाणे गरीब कुटुंबातील कॅन्सरग्रस्त, किडनी ग्रस्त, ब्रेनट्युमर, यासारख्या भयानक आजाराने ग्रासलेले तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या रंगमंचावर रेन्बो फ्रेन्डसर्कल कवठणी निर्मित २ अंकी तुफान विनोदी…

Read More

देवली- वाघवणे सातेरी मंदिरात अक्षय्य तृतीया सोहळा

मालवण ता.२७-:* देवली वाघवणे येथील श्री देवी सातेरी मंदिरात श्री देवी सातेरी प्रासादिक भजन आणि नाट्यमंडळ नवागर व्हाळ तसेच श्री सातेरी विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने अक्षय्य तृतीया सोहळा दि. ३ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. गणेश पूजा व देवीला अभिषेक, सकाळी ९ वा. होम हवन, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी…

Read More

श्री देव वेतोबा जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

माजी विद्यार्थी सागर नानोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्याचे उद्घाटन सावंतवाडी ता 27: श्री देव वेतोबा जि.प पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळाव्या उद्घाटन आज सागर सोमकांत नाणोसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्याशाळेत एखाद्या कार्यक्रमात उद्घाटनाचा मान मिळणे म्हणजे हा अविस्मरणीय क्षण आहे शैक्षणिक प्रगती ही…

Read More

अन्यथा त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेरच रोखणार…

शिवसेनेचा इशारा; परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची हॉल तिकीट परत घ्या… सावंतवाडी ता.२७-:* परजिल्ह्यातील विद्यार्थाना नवोदय प्रवेश परीक्षेसाठी देण्यात आलेले हाॅल टिकीट परत घ्या अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना पराक्षाकेंद्राबाहेर रोखू असा इशारा आज पदाधिकाऱ्यांनी संबधित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष व मुख्याध्यापकांना दिला. याबाबतचे निवेदनही त्यांना सादर केले. तर या प्रकाराला संबधित शाळाचे मुख्याध्यापक आणि रहिवाशी दाखला देणारे तहसिलदार…

Read More

जी प शाळा नंबर ६ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा

माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी केला शुभारंभ सावंतवाडी,ता.२७-:* सावंतवाडीतील कै श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विदयालय जि.प. शाळा न. ६ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवीका दिपाली भालेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, उच्च शिक्षण तज्ज्ञ दिलीप भालेकर, गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ् श्री सांगेलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले….

Read More
You cannot copy content of this page