मालवण ता.२७-:* मालवण भरड वायरी रोड येथील मुणगेकर यांच्या निवासस्थानी दि. २८ एप्रिल रोजी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ६.३० वाजता दुग्धभिषेक, सकाळी ७ ते १२ यावेळेत समर्थांचे पूजन, दु. १२.३० वा. आरती, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. तिर्थप्रसाद, सायं. ५.३० वा. संगीत गायनाचा कार्यक्रम, रात्री ८ वा.भजने होणार आहेत. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
