साने गुरुजी वाचन मंदिरात पुस्तक प्रदर्शन संपन्न

मालवण ता.२७-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचनालयासाठी नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मालवणातील लेखिका मेघना जोशी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर गोसावी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मेघना जोशी यांनी मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळेमधील विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर यांच्या हस्ते मेघना जोशी आणि सुधीर गोसावी यांना मुलांसाठी विवेकानंद हा ग्रंथ भेट दिला. सेवांगणचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो, अदिती कुडाळकर, विजय कुडाळकर, वैष्णवी आचरेकर, सोनाली कोळंबकर, सौ. कदम, पूनम भुर्के, तेजस्विनी पाताडे, धर्माजी कांबळी, रवींद्र बागवे उपस्थित होते. कार्यक्रमाची सर्व व्यवस्था संजयकुमार रोगे व सोनाली कांबळी यांनी पाहिली. ऋतुजा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page