डॉ. सुधीर शिवेश्वरकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

*⚡मालवण ता.२७-:* ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे तर्फे दिला जाणारा या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. सुधीर शिवेश्वरकर यांना प्रा. चंद्रशेखर हडप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा मानून अहोरात्र कार्य करणारे डॉ. शिवेश्वरकर याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वार हडप यांनी येथे काढले.

आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) आचरा पंचक्रोशी या संस्थेचा या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार येथील शिवेश्वरकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुधीर घनःश्याम शिवेश्वरकर यांना जाहीर करण्यात आला होता. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते शिवेश्वरकर हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी गेली ४० वर्षे केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे मावळते अध्यक्ष बाबाजी भिसळे, विद्यमान अध्यक्ष अशोक कांबळी, श्रीकांत सांबारी, सुरेश ठाकुर, जे. एम. फर्नांडिस, सुरेश गावकर, अरुंधती कांबळी, लक्ष्मण आचरेकर आदी उपस्थित होते. बाबाजी भिसळे यांना ज्येष्ठ सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page