मालवण ता.२७-:* मालवण धुरीवाडा कुरण येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात २८ एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
२७ रोजी सकाळी ७ ते २८ रोजी सकाळी ७ पर्यंत अखंड नामस्मरण (नामस्मरणात सहभागी होणाऱ्यांची निवास, भोजनाची सोय करण्यात येईल.) २८ रोजी सकाळी ७.३० ते ९ वा. काकड आरती, भूपाळ्या, अभिषेक, पूजन, ९ वा. चरित्र सारामृत ग्रंथाची सामूहिक पारायणे, दुपारी ११.३० वा. ग्रंथ प्रकाशन ‘श्री समर्थ-कैवल्य हिरा’ या रवींद्र धामापूरकर लिखित, शंकर लोके यांनी प्रकाशित केलेल्या चरित्र ग्रंथाचे प्रा. रवींद्र वराडकर यांच्या हस्ते प्रकाशन, दुपारी १२.३० वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, दुपारनंतर त्रिमूर्ती भक्तिसंगम, मालवण यांचे गीतगायन. मुंबईचे प्रख्यात गायक प्रथमेश शंकर लोके आणि मित्रमंडळ यांचे भक्तिगीत गायन. नामदेव महाराज करंगुटकर (गोवा) यांचे कीर्तन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी समर्थ सेवेकरी धामापूरकर कुटुंबिय यांनी केले आहे.
