देवली- वाघवणे सातेरी मंदिरात अक्षय्य तृतीया सोहळा

मालवण ता.२७-:* देवली वाघवणे येथील श्री देवी सातेरी मंदिरात श्री देवी सातेरी प्रासादिक भजन आणि नाट्यमंडळ नवागर व्हाळ तसेच श्री सातेरी विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने अक्षय्य तृतीया सोहळा दि. ३ मे रोजी साजरा होणार आहे.

यानिमित्त सकाळी ७ वा. गणेश पूजा व देवीला अभिषेक, सकाळी ९ वा. होम हवन, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४.३० श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद तसेच रात्री १० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग ‘स्मशान योगी महाकाल’ सादर होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page