श्री देव वेतोबा जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

माजी विद्यार्थी सागर नानोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्याचे उद्घाटन

सावंतवाडी ता 27: श्री देव वेतोबा जि.प पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळाव्या उद्घाटन आज सागर सोमकांत नाणोसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्याशाळेत एखाद्या कार्यक्रमात उद्घाटनाचा मान मिळणे म्हणजे हा अविस्मरणीय क्षण आहे शैक्षणिक प्रगती ही मराठी शाळांतुन होत असून मराठी शाळा हा जीवनाचा मुळ पाया आहे म्हणूनच ह्या मराठी शाळा वाचणे गरजेचे आहे असे मत सागर नाणोसकर म्हणाले.

यावेळी गावचे उपसरपंच संजय नाणोसकर, मुख्याध्यापिका सौ चोडणकर , शिक्षक श्री परब, श्री गुरव,रजनी नाणोसकर, आरोग्य सेविका सौ नवार, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ जोशी, आशा सेविका उर्मिला तळकर, ग्रामपंचायत सदस्य विद्या नाणोसकर, नम्रता नाणोसकर, सौ ठाकुर, श्री गोडकर, आदी ग्रामस्थ आणि मुले उपस्थित होती

You cannot copy content of this page