हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे आवाहन
सावंतवाडी ता.२७-:* हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्गच्या वतीने देऊ मायेचा हात, उचलू दुःखाचा भार या उक्तीप्रमाणे गरीब कुटुंबातील कॅन्सरग्रस्त, किडनी ग्रस्त, ब्रेनट्युमर, यासारख्या भयानक आजाराने ग्रासलेले तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या रंगमंचावर रेन्बो फ्रेन्डसर्कल कवठणी निर्मित २ अंकी तुफान विनोदी नाटक ‘ शबय’ आयोजित करण्यात आले.
असून, हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या या कार्यात सामाजिक बांधिलकी म्हणून दानशूर दात्यानी हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग AC. No.050400000007412, IFSC SDIC0001050 या अकाउंडवर यथाशक्ती हातभार लावून समाजसेवेत सहभागी व्हावे असे विनम्रपणे आवाहन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे 7875837568 या क्रमांकावर संपर्क साधावा.
