Headlines

घोटगे-सोनवडे घाटरस्ता होणार; ग्रामस्थांचा जल्लोष

४० वर्षांची प्रतीक्षा संपली ;घाटरस्त्याला केंद्राची मंजुरी कुडाळ : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घोटगे-सोनवडे घाटरस्त्याच्या प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत जोरदार जल्लोष केला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी राणे कुटुंबीयांचे विशेष आभार मानले.घोटगे-सोनवडे घाटमार्ग पूर्ण व्हावा, यासाठी गेल्या चार दशकांपासून सातत्याने मागणी आणि संघर्ष सुरू होता….

Read More

३३ हजार सुप्त पोस्टखात्यांत दीड कोटींची बचत ; खातेदारांना रक्कम परत मिळणार…

जुन्या बचत खात्यांची तपासणी करण्याचे पोस्ट विभागाचे आवाहन:बचत, विमा, आधार, बँकिंगसह लॉजिस्टिक्सच्या विविध सेवांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२६-: गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्ट खात्यात सुमारे ३३ हजार सुप्त (निष्क्रिय) खाती आढळली असून, या खात्यांमध्ये खातेदारांचे सुमारे दीड कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम संबंधित खातेदारांना अथवा त्यांच्या वारसांना परत मिळावी, यासाठी पोस्ट विभागाने विशेष मोहीम…

Read More

ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वास मळगाव वाचन मंदिरातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…

डॉ. अरविंद खानोलकर यांच्या स्मृतींना उजाळा; सेवाव्रती कार्याचा मान्यवरांकडून गौरव.. ⚡सावंतवाडी,ता २६-: सावंतवाडी : बालरोगतज्ज्ञ, सेवाव्रती आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर ऊर्फ सर्वांचे लाडके ‘अरुण भाई’ (जन्म : १३ मार्च १९४४, निधन : १७ ऑगस्ट २०२६) यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…

Read More

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचाची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा…

निमंत्रक संपत देसाई यांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद:शाळा वाचविण्यातही २ ऑक्टोबरला आझाद मैदानात बेमुदत धरणे.. ⚡कुडाळ ता.२६-: शिक्षण व्यवस्थेतील वाढती विषमता, सरकारी शाळांवरील संकट आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिणामांविरोधात ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून २ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे…

Read More

कणकवली पंचायत समिती चा १ सप्टेंबरला जनता दरबार…

⚡कणकवली ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कणकवली पंचायत समितीतर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार कणकवली पंचायत समितीच्या भालचंद्र महाराज सभागृहात सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार…

Read More

मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा २७ ऑगस्टला बांद्यात सत्कार

बांदा/प्रतिनिधीमराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बांदा येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता बांदा देऊळवाडी येथील बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.या सोहळ्यात समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झालेले ज्ञानेश्वर सावंत, राज्यस्तरीय निर्भीड पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार नीलेश मोरजकर आणि भाजपा बांदा युवा…

Read More

महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा नारकर यांचा सावंतवाडी दौरा…

अंगणवाडी केंद्रांची पाहणी; सुविधा, पोषण आहार व कामकाजाचा घेतला आढावा.. ⚡सावंतवाडी, ता.२५-: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा महेशकुमार नारकर यांनी सावंतवाडी तालुक्याचा दौरा करून तालुका बाल विकास प्रकल्प कार्यालयासह विविध अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेतला. इन्सूली, वाफोली आणि बांदा येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देत त्यांनी बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा…

Read More

पिंगुळी ‘तंटामुक्ती’ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भगवान रणसिंग यांची बाजी

कुडाळ : पिंगुळी गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत भगवान रणसिंग हे विजयी झाले त्यांना ६५ मते मिळाली. त्यानी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक धुरी यांचा पराभव केला.ग्रामपंचायत पिंगुळीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड असल्याने अध्यक्ष पदासाठी भगवान रणसिंग व दीपक धुरी अध्यक्षपदासाठी उभे राहिले असता सभा अध्यक्षानी निवडणूक…

Read More

कुडाळात मोकाट जनावरांच्या गळ्यात ‘रिफ्लेक्शन पट्टे’…

मंदार शिरसाट यांची अपघात रोखण्यासाठी अनोखी मोहीम:स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद.. कुडाळ : रात्रीच्या अंधारात रस्त्यावर फिरणाऱ्या अथवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कुडाळमध्ये एक अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेतून २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता शहरातील सुमारे १४ मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे ‘रिफ्लेक्शन पट्टे’ बांधण्यात आले.कुडाळचे…

Read More

गणेशोत्सवपूर्व तयारीला कुडाळ नगरपंचायतीचा वेग…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर ऑन फिल्ड:न.प.चे विविध विभाग फिल्डवर सक्रिय.. ⚡कुडाळ ता.२६-: आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम आणि सुरळीत ठेवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने पूर्वतयारीला वेग दिला आहे. नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे विविध विभाग समन्वयाने फिल्डवर उतरले असून, गणेशोत्सवापूर्वी आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाकडून…

Read More
You cannot copy content of this page