मालवण (प्रतिनिधी)
मालवण रोटरी क्लबची सन २०२६- २७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी नीलम जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी प्रविणा शिंदे व खजिनदारपदी प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवीन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते व क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने यांच्या उपस्थितीत दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे होणार आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी क्लब मालवणचे सदस्य तसेच जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
मालवण रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे – प्रेसिडेंट – नीलम जोशी, व्हाईस प्रेसिडेंट – उमेश सांगोडकर, सेक्रेटरी – प्रविणा शिंदे, जॉईंट सेक्रेटरी – तनिष्का कासवकर, ट्रेझरर – प्रदीप सामंत, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट – पंकज पेडणेकर, क्लब सर्व्हिस – सुहास ओरसकर, कम्युनिटी सर्व्हिस – डॉ. लीना लिमये, व्होकेशनल सर्व्हिस – ऋषिकेश पेणकर, इंटरनॅशनल सर्व्हिस – डॉ. अजित लिमये, युथ सर्व्हिस – अभय कदम, रोटरी फाउंडेशन – प्रदीप जोशी, मेंबरशिप डेव्हलपमेंट – बाळू तारी, क्लब ॲडमिन – महादेव पाटकर, क्लब बुलेटिन – सुविधा तिनईकर, सार्जंट ॲट आर्म्स – कमलिनी प्रभू, स्पोर्ट्स चेअरमन – अमेय पारकर, क्लब ट्रेनर – भाऊ साळगावकर, लिटरसी प्रमोशन – रमाकांत वाक्कर क्लब फेलोशिप – उमेश हळदणकर.
