कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावरील जाणवली (ता. कणकवली) येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून लावलेल्या प्रत्येक रोपाला संरक्षणासाठी ट्री गार्डही बसविण्यात आले.
यावेळी भाजयुमोचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलिंद नांदगावकर (K M Team), सिंधुदुर्ग भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, उपाध्यक्ष अनुप वारंग, मंडल अध्यक्ष अण्णा खाडये, शहराध्यक्ष सागर राणे, सरचिटणीस प्रशांत राणे, जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर यांच्यासह सिद्धेश वालावलकर, पप्पू यादव, सागर पवार, नितीन पवार, परेश कांबळी, किशोर राणे, नयन दळवी, अजित पवार, परशुराम झगडे, प्रणय शिर्के, आशिष राणे तसेच भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. भविष्यातही अशाच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
