Headlines

नागरिकांच्या मागणीनुसार मसुरे डांगमोडे बसफेरी सुरू

मालवण (प्रतिनिधी) कणकवली- मसुरे डांगमोडे ही बसफेरी बंद असल्याबाबत डांगमोडे ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी मालवण आगार व्यवस्थापकांकडे निवेदन सादर करत कणकवली- मसुरे डांगमोडे ही बस सेवा पूर्वी प्रमाणे सुरू करण्याची मागणी केल्यानंतर मालवणचे आगारव्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ८ ऑगस्ट पासून ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे मालवणचे आगारव्यवस्थापक बोवलेकर यांनी बससेवा सुरू केल्याबद्दल डांगमोडे…

Read More

मंत्रीपदानंतर केसरकर प्रथमच १३ ला जिल्ह्यात

सावंतवाडीत घेणार मेळावा:विरोधकांच्या आरोपाला उत्तर देणार का ? याकडे लक्ष ⚡सावंतवाडी ता.१०-: कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर हे पहिल्यांदाच १३ तारीख ला जिल्ह्यात येणार असून, यावेळी ते सायंकाळी ४ वाजता गांधी चौक येथे जाहीर मेळावा घेणार आहेत. यावेळी सावंतवाडीच्या नागरिकांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहेत. यावेळी ते विरोधकांना काय…

Read More

छाया चित्रकार सतीश हरमलकर यांना मातृशोक

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथील सौ. वासंती दिनेश हरमलकर वय ६८ यांचे आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात पति दिनेश ,दोन मुलगे, सुना, एक मुलगी , जावई, नातवंडे असा परिवार आहे. छायाचित्रकार सतीश हरमलकर आणि गणेश हरमलकर यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

पोलीस ठाणे कार्यालयाच्यावतीने स्वच्छ्ता मोहीम

पोलीस ठाणे, तहसील परिसर करण्यात आला स्वच्छ मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज मालवण तहसील कार्यालय आणि पोलीस स्थानक यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय तसेच मालवण पोलीस स्टेशनच्या परिसरात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७:३० ते १० वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. तहसील व पोलीस स्थानक समोरील भागामध्ये झाडे लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये…

Read More

हर घर तिरंगासाठी १३ ऑगस्ट रोजी जनजागृती फेरी

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे आयोजन सावंतवाडी ता.१०: शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” मोहिमे अंतर्गत येथील येथील पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन १३ ऑगस्टला सकाळी करण्यात आले असून या रॅली येथील मिलाग्रिस हायस्कूलमधील आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.देशात…

Read More

झाड उन्मळून रस्त्यात पडल्याने झाला अपघात

स्थानिक युवकांनी झाड केले बाजूला ⚡बांदा ता.१०-: बांदा सटमटवाडी येथे महामार्गांवर झाड उनमळून पडल्याने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. वाहतुकीस धोकादायक ठरणारे हे झाड स्थानिक युवकांनी रात्री उशिरा बाजूला करत रस्ता वाहतुकीस मोकळा केला. महामार्गांवर झाड पडल्याने रात्रीच्या अंधारात दुचाकीला अपघाता झाला. याची माहिती मिळताच भाजपचे बूथ अध्यक्ष अक्षय परब, सचिव शुभम साळगावकर, मुकेश…

Read More

गणेशोत्सव पूर्वी दहा दिवस रास्त धान्य द्या

बांदा भाजपचे तहसीलदार यांना निवेदन बांदा/प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टी बांदा तर्फे सावंतवाडी तहसीलदार यांना भेटून कोकणातील सर्वात महत्वाचा सण गणेश चतुर्थी ह्या सणाच्या वेळी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेशनिंग दुकानावरील धान्य साठा किमान दहा दिवस अगोदर रेशनधारकाना उपलब्ध करावा, त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या धान्य व तेलाच्या वाटप प्रमाणात थोडी वाढ करून द्यावी अशी मागणी करण्यात…

Read More

माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार प्रेरक

पोलीस निरीक्षक शामराव काळे ⚡बांदा ता.१०-: स्वातंत्रसैनिक व माजी सैनिक यांचे देशासाठी असलेले योगदान हे अनमोल आहेच, तर कित्येक जवानांनी आपल्याला देशासाठी दिलेले बलिदान देखील हे न विसरता येण्यासारखे आहे. बांदा ग्रामपंचायतने माजी सौनिक व त्यांच्या कुटुंबियांचा केलेला सत्कार हा समाजासाठी प्रेरक आहे असे गौरवोदगार बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे काढले.स्वातंत्र्याचा मृतमहोत्सव निमित्त…

Read More

बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने राबविले स्वच्छता अभियान

⚡बांदा ता.१०-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा येथून करण्यात आली . यावेळी शाळा,बांदा बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे या परिसराची सफाई करण्यात आली. यावेळी बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी बांदा बाजारपेठेतून स्वच्छतेसंबंधी घोषणा देत प्रभातफेरी काढली. या अभियानात बांदा…

Read More

शिवसेनेच्या बैठका १३ ऑगस्ट रोजी

पक्ष सचिव तथा खा विनायक राऊत राहणार उपस्थित सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची विधानसभा मतदारसंघ निहाय महत्वाच्या बैठका शनिवार १३ ऑगस्ट रोजी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. या बैठकीला शिवसेना जिल्हा युवानेते संदेश पारकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page