⚡मालवण ता.२५-:
शिवसेनेच्या महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी मालवणच्या नगरसेविका व आरोग्य सभापती सौ.पूनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. पूनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी निवड करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच महिला सेनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पूनम चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेच्या महिला सेना जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते यांच्या कडून सौ. पूनम चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, चित्रा हरमळकर, विद्या फर्नांडिस, सौ. प्रभाळे, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी गडकर, अक्षता गावडे आदी व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
