पोलीस निरीक्षक शामराव काळे
⚡बांदा ता.१०-: स्वातंत्रसैनिक व माजी सैनिक यांचे देशासाठी असलेले योगदान हे अनमोल आहेच, तर कित्येक जवानांनी आपल्याला देशासाठी दिलेले बलिदान देखील हे न विसरता येण्यासारखे आहे. बांदा ग्रामपंचायतने माजी सौनिक व त्यांच्या कुटुंबियांचा केलेला सत्कार हा समाजासाठी प्रेरक आहे असे गौरवोदगार बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे काढले.
स्वातंत्र्याचा मृतमहोत्सव निमित्त बांदा ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिक व व त्यांच्या कुटुंबियांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच अक्रम खान, ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक एस आर सावंत, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, साई काणेकर, शामसुंदर मांजरेकर, जावेद खतीब, राजेश विरनोडकर, रिया आलमेडा, किशोरी बांदेकर, स्वप्नाली बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक संघाने केले होते. प्रास्ताविक अन्वर खान यांनी केले. आभार बाळू सावंत यांनी मानले.
