⚡बांदा ता.१०-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा येथून करण्यात आली .
यावेळी शाळा,बांदा बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे या परिसराची सफाई करण्यात आली. यावेळी बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी बांदा बाजारपेठेतून स्वच्छतेसंबंधी घोषणा देत प्रभातफेरी काढली. या अभियानात बांदा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच सफाई कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, तरूण मंडळे, महिला मंडळ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते
