Headlines

मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सहदेव बापर्डेकर यांची तर सचिवपदी पुनम चव्हाण आणि खजिनदारपदी राधिका मोंडकरयांची निवड

मालवण | प्रतिनिधी:

लायन्स क्लब मालवणच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या नूतन संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव बापर्डेकर यांची तर सचिवपदी पुनम चव्हाण आणि खजिनदारपदी राधिका मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. मालवण लायन्स क्लबच्या नूतन कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्या शुभहस्ते रविवार १९ जुलै रोजी सायं ६.३० वा. दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे

यावेळी अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, माजी अध्यक्ष झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, प्रथम उपाध्यक्ष मनाली दळवी, द्वितीय उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, तृतीय उपाध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, सहसचिव अंजली आचरेकर, सह खजिनदार मुकेश बावकर, टेल टिस्टर मिना घुर्ये, टेमर जयश्री हडकर, स्वच्छ भारत मिताली मोंडकर, मेंबरशिप चेअरमन मेघः श्याम शंकरदास, एलसीआयएफ चेअरमन स्नेहा जामसंडेकर, पीआरओ दिक्षा गांवकर, जीएसटी चेअरमन, फॅनी फर्नांडिस, जीएलटी चेअरमन पल्लवी खानोलकर, जीएमटी चेअरमन डॉ. हरीश परुळेकर, कॅम्पेन 100 श्वेता यादव, अॅक्टिव्हीटी चेअरमन नंदिनी गांवकर, हेल्थ अवरनेस वैशाली शंकरदास, लीडरशिप शाम नार्वेकर, साईट फस्ट डॉ. प्रिया रिवणकर, बुथ प्रोग्राम रूपा कांदळगांवकर, फंड रेजिंग ऋग्वेदा धामापूरकर, डायबेटीस अवरनेस डॉ. दर्शन खानोलकर, बुलेटिन ऐडिटर मनिषा गांवकर, रेलिविंग हंगर विश्वास गांवकर, पर्मनंट प्रोजेक्ट महेश कारेकर तसेच संचालक मंडळ : नाना साईल, महेश अंधारी (पीएमजेएफ), रुजारिओ पिंटो (एमजीएफ), उमेश नेरुरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, गणेश प्रभुलकर, दत्ताराम रेवणकर, विराज आचरेकर, अरविंद सराफ, मोहन पटेल, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, शांती पटेल, उदय घाटवळ या नूतन संचालक मंडळास शपथ देण्यात येणार आहे.

या शपथविधी व पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहावे. असे आवाहन मालवण लायन्स क्लब यांनी केले आहे

You cannot copy content of this page