Headlines

सावंतवाडीत ७ नोव्हेंबरला भाजपच्या माध्यमातून नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

पहिल्या क्रमांकासाठी ५७ हजार ५६ रुपयांचे पारितोषिक; हितेन नाईक यांचा पुढाकार, विनोद राऊळ, अँड अनिल निरवडेकर, विशाल परब यांचा सहकार्य..

⚡सावंतवाडी ता.२३-: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप पदाधिकारी हितेन नाईक यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा जगन्नाथराव भोसले उद्यान येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक ५७ हजार ५६ रुपये ठेवण्यात आले आहे. या आयोजनासाठी विनोद राऊळ, अॅड. अनिल निरवडेकर आणि भाजप युवा नेते विशाल परब यांचे सहकार्य लाभत आहे.
नरकासुर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी हितेन नाईक (८२९१४९४८९७) किंवा पंकज तुळसुळकर (९१३०६८३४७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page