Headlines

S.I.R. प्रक्रिया यशस्वी राबवल्याबद्दल परीक्षित मांजरेकरांचा मंत्र उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार…!

⚡कुडाळ, ता. १४-: कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली S.I.R. प्रक्रिया तीनही तालुक्यांत यशस्वीरित्या राबवल्याबद्दल शिवसेना जिल्हा सचिव, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे B.L.A. तसेच विधानसभा प्रमुख परीक्षित मांजरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी संघटनात्मक कामकाजात त्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत, SIR अभियान संपर्क प्रमुख विजय उर्फ बाळा चिंदरकर, कुडाळ-मालवण विधानसभा BLA प्रमुख काका कुडाळकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संवाद मेळाव्यात संघटन बळकटी, आगामी राजकीय वाटचाल आणि पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी राबविलेल्या विविध अभियानांचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

You cannot copy content of this page