Headlines

शिवसेनेतर्फे विनायक राऊत यांच्या विरोधात संताप निदर्शने…

विनायक राऊत यांच्या विरोधात महिलांची जोरदार घोषणाबाजी:कारवाई करण्याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात दिले निवेदन..

⚡कुडाळ ता.१५-: आपल्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भोंदू बाबांविरुद्ध तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेने तर्फे आज सकाळी संताप निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणा देऊन माजी खासदार विनायक राऊत यांचा निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जि प सदस्या दीपलक्ष्मी पडते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यांनतर कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन विनायक राऊत, त्यांचे कुटुंबीय आणि भोंदू बाबांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे कुटुंबीय तसेच संबंधित भोंदू बाबा यांच्या विरोधात त्यांची सून श्रीमती गिरीजा गीतेश राऊत यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये मानसिक व शारीरिक छळ, तसेच महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या अत्यंत गंभीर बाबींचा समावेश असल्याने स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि न्यायासाठी आज शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकऱ्यांच्या वतीने येथील महायुती कार्यालयासमोर संताप निदर्शने करण्यात आली. यावेळी विनायक राऊत हाय हाय, विनायक राऊतांचा निषेध असो, अन्याय करणाऱ्यांना माफी नाही, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाला अटक करा, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख दीपलक्ष्मी पडते यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या जोरदार टीका केली आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. विनायक राऊत यांच्या सुनेवर जो अन्याय करण्यात आला आहे हि निंदा करण्यासारखी गोष्ट आहे. राऊत हे नेहमी मोठ्या वलग्ना करतात गणेशत्सवात तर आपण मोठे आध्यत्मिक गुरु असल्याचे भासवतात. पण घरात एवढा घाणेरडा आणि नीच प्रकार करतात त्याचा आम्ही शिवसनेतर्फे जाहीर निषेध करतो. कुठच्याही महिलेला असा त्रास दिला जाऊ नये या मानसिकेतेतून आम्ही एकत्र आलो आहोत. विनायक राऊत, त्यांचा मुलगा याना त्यांच्या कुटुंबांची सुद्धा साथ होती. म्हणून त्यांनी एवढं करण्याचं धाडस केलं. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची बदनामी झाली. जिल्ह्यातील काही लोकांचा यात सहभाग आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सुद्धा दिली आहे. आता सुद्धा आम्ही कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. जो घर सांभाळू शकत नाही तो राजकारणात उजळ माथ्याने का फिरतोय ? असा सवाल कसुन सौ. पडते यांनी विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी शिवसेनेतर्फे कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे कि, स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि न्याय हे आपल्या समाजाचे मूलभूत तत्त्व आहेत. अशा प्रकारच्या घटना समाजात भीती आणि अस्वस्थता निर्माण करतात. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व तातडीने चौकशी करून दोर्षीवर कठोर कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. तसेच, संबंधित भोंदू बाबांकडून अंधश्रद्धा पसरवून महिलांचा गैरफायदा घेतला जात असल्याची शक्यता लक्षात घेता, त्यांच्याविरोधातही योग्य ती कारवाई करण्यात यावी. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय मिळवून ‌द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तात्काळ योग्य ती पावले उचलावीत.
यावेळी दीपलक्ष्मी पडते, जि प सदस्य यज्ञा साळगावकर, वर्षा सांबारी, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, प्रज्ञा राणे, रेवती राणे, नगरसेवक अभिषेक गावडे, जिल्हाप्रमुख युवासेना संग्राम साळसकर, उपशहर प्रमुख चेतन पडते, पुर्वा आडेकर, समिक्षा गोवेकर, साक्षी कवठणकर, यशश्री वालावलकर, निता नाईक, मयुरी वेंगुर्लेकर, यशोदा धुरी, मथुरा धुरी, सुनिता धुरी, तेजश्री धुरी, रंजना बांबुळकर, तारीका धुरी, मधुरा तुळसकर, जान्हवी कदम, रश्मी नाईक, राजवीर पाटील, प्रथमेश केळबाईकर, मंदार पडवळ, सागर वालावलकर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page