Headlines

कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात स्वच्छता अभियान

कणकवली: देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत कोकण रेल्वेकडून विविध स्थानके आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.

या अभियानांतर्गत स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभात फेऱ्यांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या मोहिमेत शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांचाही सहभाग घेतला जात आहे.

सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे आणि स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न कोकण रेल्वेकडून केला जात आहे.

You cannot copy content of this page