पक्ष सचिव तथा खा विनायक राऊत राहणार उपस्थित
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची विधानसभा मतदारसंघ निहाय महत्वाच्या बैठका शनिवार १३ ऑगस्ट रोजी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत.
या बैठकीला शिवसेना जिल्हा युवानेते संदेश पारकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, महिला जिल्हा संघटक सौ निलम पालव, सौ जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक मंदार शिरसाट उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बेसिक महिला युवासेनेच्या उपविभाग प्रमुख पदापर्यंत सर्व पदाधिकारी तसेच शिवसेना जिल्हा कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य आणि माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे
