वैभववाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळ विस्तारात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागली आहे. श्री. चव्हाण यांना मंत्री पद मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी त्यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले. मंगळवारी या नवीन सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झाला. या मंत्री मंडळात आ.रवींद्र चव्हाण यांना कँबिनेट मंत्री पद मिळाले. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. मंत्री चव्हाण यांच्या भेटीसाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज वैभववाडीतून प्रमोद रावराणे हे मुंबईत पोहचले आहेत. रावराणे व मंत्री श्री चव्हाण यांचे जवळचे संबंध आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली.त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री चव्हाण यांनी तालुक्यातील विकासकामांसोबतच जिल्ह्यातील कामांबाबत रावराणे यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व प्रलंबित विषय मार्गी लावले जातील अस आश्वासन दिलं.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके,माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे,माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केले अभिनंदन
