गणेशोत्सव पूर्वी दहा दिवस रास्त धान्य द्या

बांदा भाजपचे तहसीलदार यांना निवेदन

बांदा/प्रतिनिधी
. भारतीय जनता पार्टी बांदा तर्फे सावंतवाडी तहसीलदार यांना भेटून कोकणातील सर्वात महत्वाचा सण गणेश चतुर्थी ह्या सणाच्या वेळी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेशनिंग दुकानावरील धान्य साठा किमान दहा दिवस अगोदर रेशनधारकाना उपलब्ध करावा, त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या धान्य व तेलाच्या वाटप प्रमाणात थोडी वाढ करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.
. रेशनिंग दुकानावरील धान्य साठा आवश्यकतेनुसार उपलब्ध असावा, त्याबाबत आपल्या धान्य पुरवठा विभागाला आपण आवश्यक सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासोबत चर्चा करताना भारतीय जनता पार्टी बांदा शहर सहअध्यक्ष बाबा काणेकर, केदार कणबर्गी, निलेश सावंत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page