झाड उन्मळून रस्त्यात पडल्याने झाला अपघात

स्थानिक युवकांनी झाड केले बाजूला

⚡बांदा ता.१०-: बांदा सटमटवाडी येथे महामार्गांवर झाड उनमळून पडल्याने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. वाहतुकीस धोकादायक ठरणारे हे झाड स्थानिक युवकांनी रात्री उशिरा बाजूला करत रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

महामार्गांवर झाड पडल्याने रात्रीच्या अंधारात दुचाकीला अपघाता झाला. याची माहिती मिळताच भाजपचे बूथ अध्यक्ष अक्षय परब, सचिव शुभम साळगावकर, मुकेश तारी, दीपेश कुबल तानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

You cannot copy content of this page