हर घर तिरंगासाठी १३ ऑगस्ट रोजी जनजागृती फेरी

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे आयोजन

सावंतवाडी ता.१०: शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” मोहिमे अंतर्गत येथील येथील पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन १३ ऑगस्टला सकाळी करण्यात आले असून या रॅली येथील मिलाग्रिस हायस्कूलमधील आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात “हर घर तिरंगा” मोहीम राबविली जात आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रॅली काढल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस प्रशासनाकडून ही फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी “हर घर तिरंगा” अभियानात सहभागी होण्याचा संदेश नागरिकांना दिला जाणार आहे. तर या रॅलीत पोलिसांसह येथील मिलाग्रिस हायस्कूल मधील आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असे श्री. कोरे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page