पोलीस ठाणे कार्यालयाच्यावतीने स्वच्छ्ता मोहीम

पोलीस ठाणे, तहसील परिसर करण्यात आला स्वच्छ

मालवण (प्रतिनिधी)

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज मालवण तहसील कार्यालय आणि पोलीस स्थानक यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय तसेच मालवण पोलीस स्टेशनच्या परिसरात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सकाळी ७:३० ते १० वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. तहसील व पोलीस स्थानक समोरील भागामध्ये झाडे लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये तहसीलदार श्री. अजय पाटणे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे व महसूल कर्मचारी, मालवणचे पोलीस निरीक्षक श्री. विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे श्री सदस्य, चिंदर, आंबेरी आणि मालवणचे सदस्यही सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page