मालवण नगरपालिकेच्या इकोब्रिक्स स्पर्धेत महेंद्र पराडकर, वेदांत नाईक, भूषण मेतर विजेते
⚡मालवण ता.१३-; प्लास्टिकवर बंदी बाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त मालवण- इकोब्रिक्स स्पर्धेत पत्रकार महेंद्र पराडकर यांनी प्रथम तर विद्यार्थी वेदांत नाईक याने द्वितीय व पत्रकार भूषण मेतर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मालवण नगरपालिकेतर्फे मामा वरेरकर नाट्यगृह तेथे आयोजित सन्मान सोहळ्यात या तिन्ही विजेत्यांना पारितोषिके देऊन…
