हर घर तिरंग्यासाठी भाजपचा पुढाकार

अडीज हजार तिरंगा वाटप;शहराध्यक्ष अजय गोंदावळे आणि पदाधिकारी यांचा पुढाकार

⚡सावंतवाडी ता.१३- : आजादी का अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात राबविले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विशेष पुढाकार या अभियानासाठी घेण्यात आला आहे. सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे आणि भाजप पदाधिकारी यांच्या माध्यमातून शहरात घरोघरी जात अडीच हजार झेंड्यांच वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे हा ध्वज काठीसह देण्यात आला. शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले. यात भाजपच्या माजी नगराध्यक्ष संजू परब पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गोंदावळे यांना साथ दिली.

You cannot copy content of this page