Headlines

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने शहरात पदयात्रा

⚡सावंतवाडी,ता.१४-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात येथील राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. या पदयात्रेवेळी येथील शिरोडा नाका ते गांधी चौक अशी रॅली काढण्यात आली.याप्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर,…

Read More

गुळदुवे येथील मठात उद्या सद्गुरू सदानंदाचार्य स्वामी पुण्यतिथी महोत्सव

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: तालुक्यातील गुळदुवे येथील मठात उद्या १५ ऑगस्ट रोजी सद्गुरू सदानंदाचार्य स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्वरी ज्ञानोपदेशक सदगुरू सदानंदस्वामींची ही पुण्यतिथी पीठाधिश्र्वर पद्मश्री विभूषित पद्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत होणार आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ब्रह्मानंदाचार्य स्वामींचे समाधी स्थान श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरून सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी…

Read More

मराठा समाजाचे दिग्गज नेतृत्व हरपले,

विनायक मेटे यांचं अपघाती निधन रायगड: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं आहे.आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. खोपली इथल्या बोगद्याजवळ हा अपघात झाला आहे. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला…

Read More

मुजीब शेख मित्र मंडळाच्यावतीने १९ ऑगस्ट रोजी एकता दहीहंडीचे आयोजन

मंडळाचे प्रमुख प्रवीण गावडे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सावंतवाडी येथील मुजीब शेख मित्र मंडळाच्यावतीने १९ ऑगस्ट रोजी गांधी चौक येथे “एकता दहीहंडी” चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सहभागी गोविंदा पथकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख प्रवीण गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.या प्रसिद्धीपत्रकात गावडे यांनी…

Read More

कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांचा युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने सत्कार

सावंतवाडी : कॅबिनेट मंत्रीपदानंतर प्रथमच सावंतवाडी मतदारसंघात आलेल्या आमदार दीपक केसरकर यांचा युवा रक्तदाता संघटनेच्या वतीने काल भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, बाबू कुडतरकर, सुजित कोरगांवकर, मेहर पडते, अनिकेत पाटणकर, गौतम माठेकर, अर्चित पोकळे, राघवेंद्र चितारी, बाबा आल्मेडा, संदिप निवळे, शुभम बिद्रे, प्रथमेश प्रभू, सुरज मठकर, अभिजीत गवस, साईश…

Read More

नेमळे ग्राम सचिवालयांचे उद्या मंत्री केसरकर यांच्याहस्ते उद्घाटन

सावंतवाडी : जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उदघाटन सोहळा उद्या सोमवार १५ ऑगस्ट रोजीसकाळी ११:३० वाजताकॅबिनेट मंत्री दिपक केसरकर व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Read More

विविध प्रलोभनांचा त्याग केला तरच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल

प्रा. रुपेश पाटील;कनेडी येथे ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर कार्यक्रम संपन्न* सावंतवाडी : शालेय जीवन म्हणजे आपल्या आयुष्याला घडविण्यासाठीचे सर्वोत्तम काळ असतो. या वयात मिळालेले संस्कार हे आपल्या भावी आयुष्याला दिशा देतात. म्हणून विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन, मनन आणि चिंतनासाठीआपला वेळ द्यावा. वयात आलेल्या मुलांना बाह्य जगाचे आकर्षण असते, तेव्हा त्यांना आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे, तसेच विविध…

Read More

गणपतीसाठी लागणाऱ्या भिंती कलाकारांच्या कुंचल्यातून रंगू लागल्या

गणेश चतुर्थीनिमित्त चित्रकारांची लगबग सुरू ⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ -: गणेश चतुर्थी सण अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने गणपतीसाठी लागणाऱ्या गणपती मागील भिंतीवर चित्रकाम व रंगकाम करण्यासाठी चित्रकारांची मोठ्या प्रमाणात धावपळ वाढली आहे. गणपतीसाठी लागणाऱ्या या भिंती कलेचा छंद असलेल्या हौसी कलाकारांच्या कुंचल्यातून रंगू लागल्या आहेत. गणेश चतुर्थी निमित्त भिंती मागे चित्र काढणे हे फार पूर्वांपर…

Read More

गोव्यातील पर्यटकांच्या गाडीला कारिवडे येथे अपघात…

प्रवासी किरकोळ जखमी; गाडीचे मोठे नुकसान.._* ⚡सावंतवाडी ता.१४-: कारिवडे येथे वळणाचा अंदाज न आल्याने गोव्यातील पर्यटकांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला असून, हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता आहे. या अपघातात गाडी पूर्णपणे रस्त्याच्या कडेला उलटी जाऊन पडली आहे. या अपघातात गाडीतील प्रवासी किरकोळ जख्मी झाले आहेत. मात्र या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

Read More

तालुक्यातील सर्व मतदारांनी मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करावे…

नायब तहसीलदार श्रीमती कासकर यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील नावामध्ये आधार कार्ड लिंक करावे. असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार श्रीमती कासकर यांनी प्रसिद्धीपञाद्वारे केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक मतदाराने आपले मतदार यादीतील नावांमध्ये आधार लिंक करण्याचे आहे. आधार लिंक केल्यानंतर दुबार नोंदणी होणार नाही प्रत्येक…

Read More
You cannot copy content of this page