⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: तालुक्यातील गुळदुवे येथील मठात उद्या १५ ऑगस्ट रोजी सद्गुरू सदानंदाचार्य स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.
श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्वरी ज्ञानोपदेशक सदगुरू सदानंदस्वामींची ही पुण्यतिथी पीठाधिश्र्वर पद्मश्री विभूषित पद्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत होणार आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ब्रह्मानंदाचार्य स्वामींचे समाधी स्थान श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरून सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी परंधाम गुळदुवेपर्यंत भव्य तिरंगा मिरवणुक सद्गुरु ब्रह्मेशनांदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत होणार आहे. येथील मठात सकाळी सद्गुरु समाधी स्थानी महापूजा, सद्गुरु भक्तीमहायज्ञ, कशिविश्र्वेश्वर स्थानी रुद्राभिषेक व स्थानिकांची भजन, त्यानंतर प्रकट कार्यक्रमात आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे आशिर्वचन होणार आहे. सायंकाळी ४ वाजता भजन, पालखी उत्सव व पूज्य सद्गुरु अशिर्वचन होईल. कार्यक्रमाला अँड ब्राह्मीदेवीजी, श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक मंडळ, कृपाकांक्षी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठा मार्फत करण्यात आले आहे.
गुळदुवे येथील मठात उद्या सद्गुरू सदानंदाचार्य स्वामी पुण्यतिथी महोत्सव
