मराठा समाजाचे दिग्गज नेतृत्व हरपले,

विनायक मेटे यांचं अपघाती निधन

रायगड: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं आहे.आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. खोपली इथल्या बोगद्याजवळ हा अपघात झाला आहे. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते.

यावेळी त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते.पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. विनायक मेटे हे आंदोलनांचा बुलंद आवाज म्हणून परिचीत होते.सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे होते. मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा म्हणून ते परिचीत होता.अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे.
आज मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला हा अपघात झाला.अपघातात जखमी झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावं लागल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केला आहे.त्यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

You cannot copy content of this page