मंडळाचे प्रमुख प्रवीण गावडे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती
सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सावंतवाडी येथील मुजीब शेख मित्र मंडळाच्यावतीने १९ ऑगस्ट रोजी गांधी चौक येथे “एकता दहीहंडी” चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सहभागी गोविंदा पथकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख प्रवीण गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात गावडे यांनी म्हटले की, गेली काही वर्षे सावंतवाडी येथील आकर्षक आणि नाविन्यपूर्ण दहीहंडी उत्सव अशी ओळख या मंडळाच्या उत्सवाची निर्माण झाली आहे. कोरोना प्रतिबंध मुक्तीनंतर या वर्षी खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव होणार आहे. गांधिचौक येथील वसंत प्लाझा इमारतीच्या परीसरात १९ ऑगस्ट रोजी होणा-या या दहीहंडी उत्सवात विविध रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तरी विविध गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचे तसेच सर्व नागरीकांना या दहीहंडी उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुजीब शेख मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे
