⚡सावंतवाडी,ता.१४-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात येथील राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. या पदयात्रेवेळी येथील शिरोडा नाका ते गांधी चौक अशी रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी ज्येष्ठ नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी, राजू मसुरकर, साक्षी वंजारी, दत्ताराम पवार, भिवानंद पवार , वसंत पवार, अभय मालवणकर, संजय लाड, अनिल कुंभार, संतोष तावडे, शशिकांत गोसावी, बबन डिसोजा, पॉल फर्नांडिस, संजय लाड, मिनिन गोम्स, माया चिटणीस आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
