तालुक्यातील सर्व मतदारांनी मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करावे…

नायब तहसीलदार श्रीमती कासकर यांचे आवाहन

वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील नावामध्ये आधार कार्ड लिंक करावे. असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार श्रीमती कासकर यांनी प्रसिद्धीपञाद्वारे केले आहे.


मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक मतदाराने आपले मतदार यादीतील नावांमध्ये आधार लिंक करण्याचे आहे. आधार लिंक केल्यानंतर दुबार नोंदणी होणार नाही प्रत्येक नागरिकांनी आधार लिंक करण्याकरता NVSP. IN किंवा Votar Helpline App किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत गरुड ॲप मध्ये आधार लिंक करण्याचे आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरी यांनी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार वैभववाडी यांनी केले आहे

You cannot copy content of this page