गणपतीसाठी लागणाऱ्या भिंती कलाकारांच्या कुंचल्यातून रंगू लागल्या

गणेश चतुर्थीनिमित्त चित्रकारांची लगबग सुरू

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ -: गणेश चतुर्थी सण अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने गणपतीसाठी लागणाऱ्या गणपती मागील भिंतीवर चित्रकाम व रंगकाम करण्यासाठी चित्रकारांची मोठ्या प्रमाणात धावपळ वाढली आहे. गणपतीसाठी लागणाऱ्या या भिंती कलेचा छंद असलेल्या हौसी कलाकारांच्या कुंचल्यातून रंगू लागल्या आहेत.

गणेश चतुर्थी निमित्त भिंती मागे चित्र काढणे हे फार पूर्वांपर चालत आल आहे. पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात रंग साहित्य उपस्थित नसल्याने गणपती मागील चित्र साध्या रंगानेच रंगविले जात असे. त्यानंतर कालांतराने त्यात बदल झाला. उत्तम प्रतीचे विविध प्रकारचे रंग साहित्य बाजारात उपलब्ध होत झाल्याने भिंतीवरील चित्रे आकर्षक अशी रंगविण्यात येत असत. मात्र आता गणपतीच्या मागे एखाद्या चित्राच्या स्टाईल बसविल्या जात असल्याने गणपती मागील भिंतीवर चित्रे काढणे मागे राहिले. तसेच आतातर डिजिटल युगात भिंतीवर बॅनर बाजीचे प्रमाण वाढल्याने या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र तरी सुद्धा काही कलेचा छंद असलेले हौसी कलाकार आपली कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई रंग साहित्याचे भरमसाठ वाढलेले दर यामुळे कलाकारांना काम करणे कठीण झाले आहे. तरी पण या डिजिटल युगात काही ग्रामीण भागात अजूनही गणपतीच्या पाठीमागील भिंतीवर चित्रे काढण्याचे प्रमाण शिल्लक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी हे हौसी कलाकार आपली आवड व कला जिवंत ठेवण्यासाठी ती टिकविण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी हे कलाकार मोठ्या जिद्दीने काम करत आहेत. जरी या कलाकारांना , या कलेबाबत मिळणारा मोबदला कमी असला तरी मात्र हे कलाकार आपली कला टिकविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

You cannot copy content of this page