मालवणात अकरा दिवसांच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप
⚡मालवण ता.१०-: गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती चालले गावला… चैन पडे ना आम्हाला…. असा जयघोष करत, बेंजोच्या तालावर तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आज मालवणात अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशी दहाव्या दिवशी आल्याने काल मालवणात विसर्जन करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या कमी दिसून आली…
