घरगुती गणपतीस सार्वजनिक गणपतीना भक्तिपूर्ण वातावरणात निरोप…

वैभववाडी संजय शेळके
   वैभववाडी तालुक्यात अनंतचतुर्थी दिवशी घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणपतींचे वाजत गाजत, गुलालाची उधळण व फटाक्याची अतिषबाजी करीत गावागावातील नदी किनारी गणपती घाट येथे करण्यात आले. वैभववाडी शहरातील तीन सार्वजनिक गणपतींचे विसर्जन भव्य विसर्जन मिरवणूकीने  राञी उशीरा शुकनदी येथील गणपती घाटावर करण्यात आले.
    अकराव्या दिवशी सर्वच घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.  दुपारी तीन वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झाली होती. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला अशा जयघोषात ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले.
    वैभववाडी शहरातील तीन सार्वजनिक गणेशउत्सव मंडळे असून या तिन्ही ठिकाणी मोठ्या थाटामाटात गणेशउत्सव साजरा करण्यात आला.शुक्रवारी सायंकाळी ५ वा. शहरातील गणेश नगर येथील सार्वजनिक गणपती, गोपाळ नगर येथील  सार्वजनिक गणपती , तांबेवाडी येथील सार्वजनिक गणपतींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत अबालवृध्द आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सहभागी झाले होते. मिरवणूकीत गुलाल उधळत डिजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. राञी उशीरा शुकनदी येथील गणपती घाटावर भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूकीसाठी शहरात नागरीकांनी गर्दी केली होती. विसर्जन मिरवणूकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे तालुक्यात सर्वञ शांततेत गणपती उत्सव व गणपती विसर्जन पार पडले.

फोटो- नावळे येतील शेळके कुटूब अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना
छाया- संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page