सायबर क्राईम व सुरक्षा तसेच अंमली पदार्थ दुष्परिणामबाबत मार्गदर्शन
वेंगुर्ला
‘सुरक्षित सिंधुदुर्ग ‘अभियान अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे व MKCL निकॉम कॉम्पुटर यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली अणसूर-पाल हायस्कूल, अणसूर येथे अमली पदार्थ व सायबर सुरक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजित करण्यात आले होते. “शालेय वय हे अतिशय संवेदनशिल वय असते त्यामुळे याच वयात विदयार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजाऊन सांगितले तर ते या अमली पदार्थांच्या आहारी जाणार नाहीत व व्यसनांपासून दूर राहतील त्यामूळे पुढे भावी जीवनात देशाचा व आपल्या आईवडीलांचा नावलौकिक वाढवतील.”असे प्रतिपादन वेंगुर्ला पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी केले.
याचवेळी मोबाइल व इंटरनेटचा अतिवापर व त्यांच्या वापराबाबत जागरुकता नसल्यामुळे होणार्या सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी निकॉम कॉम्पुटरचे संचालक प्रशांत निकम उपस्थित होते. त्यांनी मोबाईलच्या वापराबाबत सजग राहण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकर यांनी व संचिता परब यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या माजी शिक्षिका अक्षता पेडणेकर , सहा.शिक्षिका प्रीती परब, क्रीडा शिक्षक प्रा. हेमंत गावडे व होमगार्ड श्री. शेटकर उपस्थित होते. तसेच श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे व कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली या ठिकाणी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सायबर क्राईम व सुरक्षा तसेच अंमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. सदरचा कार्यक्रम जिल्हा
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, महिला पोलीस अंमलदार सायली दाभोलकर, होमगार्ड रहाटे यांनी घेतला. सदर कार्यक्रमास सुमारे 480 मुले व शिक्षक सर्व स्टाफ उपस्थित होते. भविष्यात सायबर गुन्हे घडू नये व कशाप्रकारे गुन्हे घडतात त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन सौ. टेमकर यांनी केले.तसेच अंमली पदार्थाचे सेवन किती विघातक आहे त्याचे दुष्परिणाम काय आहेत व या गुन्ह्यांकडे मुले कशी वळतात यातील भविष्यातील धोके यासंदर्भात मार्गदर्शन विद्यार्थी विद्यार्थिनींना करण्यात आले.
