अकरा दिवसांच्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन

⚡बांदा ता.१०-:
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा नामगजरात आज अकरा दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन जल्लोषात करण्यात आले. मडुरा दशक्रोशीतील अकरा दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी बाप्पाचं विसर्जन केले.
दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक होता. अनेक नवस बोलणे-फेडणे असल्यामुळे बाप्पाचा पाहुणचार मनोभावे करण्यात आला. पावसानेही काही काळ विश्रांती घेतल्याने भक्तांची गर्दी पहावयास मिळाली. काही ठिकाणी तर किरीवारी जाण्यासाठी भक्तगण वाटेवर झोपलेले होते. गणरायाला नेताना उजव्या पायाचा अंगठा लावण्याची प्रथा अजूनही कार्यरत असल्याचे दिसून आले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात अकरा दिवसांच्या गणरायाला भक्ती भावाने निरोप देण्यात आला.

You cannot copy content of this page