नांगरतास येथे टस्कराने अडविला रस्ता

वाहनचालकात भीतीचे वातावरण : गाड्यांची वर्दळ वाढल्यानंतर टस्कराने धूम ठोकली

बांदा/प्रतिनिधी
चंदगड, आंबोली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टस्कर हत्तीने आज नांगरतास येथे भर रस्त्यात पुन्हा दर्शन दिल्याने वाहनचालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांदा केंद्रशाळेचे शिक्षक जे डी पाटील हे सपत्नीक बांदा येथे येत असताना गजराजाचे त्यांना दर्शन झाले. त्यांनी याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले आहे. तब्बल १० मिनिटे त्याचे वास्तव्य होते. त्यानंतर तो लगतच्या झाडीत दिसेनासा झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिक्षक जे डी पाटील हे आपली शिक्षक पत्नी सौ. स्वाती पाटील यांच्यासोबत आपल्या मोटारीने चंदगड येथून बांद्यात येत होते. आंबोली बेळगाव रस्त्यावर नांगरतास येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भल्यामोठ्या टस्कराने त्यांचा रस्ता अडवीला. सुमारे १० मिनिटे गजराज रस्त्यावर होता. यावेळी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नव्हती. गाड्यांची वर्दळ वाढल्यानंतर टस्कराने नजिकच्या झाडीत आश्रय घेतला. गेले काही दिवस या परिसरात टस्कराने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे.

You cannot copy content of this page