खेळासाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी नामनिर्देश प्रस्ताव पाठवण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन…

मालवण दि प्रतिनिधी

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार २०२२ च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्रसरकारकडे सादर करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

तसेच या वर्षापासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र सरकारच्या dbtyas-sports. gov.in या पोर्टलवर संकेतस्थळावर सादर करावेत. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत समस्या आल्यास (०११-२३३८७४३२) या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते सायं ५.३० पर्यंत संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page