त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…

त्या वस्तीतीतील नागरिकांचा आरोप ..

मालवण (प्रतिनिधी)
तीन महिन्यापूर्वी मालवण शहरातील एसटी स्टँड नजीकच्या कामतेकर हॉटेल पासून बौद्धवाडी ते मुस्लिम मोहोल्ला या रस्त्यावर मालवण नगरपालिकेने पेव्हर ब्लॉग्स बसवून सुशोभीकरण करण्याचा एकीकडे प्रयत्न केल्यानंतर हे प्रयत्न पावसाच्या पाण्याने धुळीस मिळाले आहे. गेल्या महिन्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ऐन गणेशोत्सवात गणेश भक्तांना आणि वाहन चालकांना खड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हा रस्ता बनविला गेल्याचा आरोप दलित वस्ती आणि मुस्लिम मोहोल्ला येथील नागरिकांनी करतानाच या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे मालवणचे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

मालवण एसटी स्टँड नजीकच्या कामतेकर हॉटेल पासून बौद्धवाडी ते मुस्लिम मोहल्ला या रस्त्याचे नूतनीकरण करण्याबाबत निधी मंजूर झाल्यावर नगरपालिकेकडून ठेकेदारामार्फत मे महिन्यात या पूर्ण रस्त्यावर पेव्हर ब्लॉक्स बसविण्यात आले. मात्र, आता तीन महिने उलटल्यावर हा रस्ता खचून खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हा रस्ता बनविण्यात आला असा आरोप तेथील नागरिकांनी निवेदनात केला आहे. गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत नागरिकांना जोखीम पत्करून या खड्डेमय रस्त्यावरून हातगाडीने गणपतीचे आगमन व विसर्जन करावे लागले. तसेच या खड्ड्यांमुळे वाहन चालकांनाही त्रास होत असून रात्रीचे या रस्त्यावरून वाहन चालविणे किंवा चालत जाणे घातक ठरत असून अपघात होण्याची शक्यता आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असून वाहनांची सतत ये जा असते त्यामुळे या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याबाबत संबंधित ठेकेदार व बांधकाम प्रशासनास आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या निवेदनावर सिध्दार्थ मालवणकर, गौरव मालवणकर, रवींद्र मालवणकर, दिनकर मालवणकर, नयना मालवणकर, कार्तिक कासले, प्रसाद मालवणकर, अमोल कांबळे, सिद्धांत देऊलकर, मंजित नार्वेकर, सचिन नार्वेकर, समीर कदम, रजनीकांत पेंडूरकर, सुरेश मालवणकर, नितेश हडकर, गुणेश हडकर आदी व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page