⚡सावंतवाडी ता.१०- : कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती कुडाळचे प्रशासक व गटविकास अधिकारी विजय चव्हाण असणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून साळगाव ग्रामपंचायतचे सरपंच उमेश धुरी, शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी – साळगावचे अध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर, संस्थेचे सचिव मुकुंद धुरी असणार आहेत.
तसेच या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. तरी कुडाळ तालुक्यातील विविध शाळा, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व विज्ञान प्रेमींनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर तसेच शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावचे मुख्याध्यापक सलीम तकिलदार, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक संघटना, विज्ञान व गणित मंडळ, कुडाळ तालुका यांनी केले आहे
