Headlines

आधुनिक सुविधांचा वापर जीवन समृध्द करते
प्रा राजेंद्र शेवडे

वैभववाडी संजय शेळकेसोयी सुविधा व विविधता नेहमीच आयुष्याला सर्वश्रेष्ठ ठरवतात. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जलद वापर आणि सर्वश्रेष्ठ मानसिक आत्मविश्वास हेच आधुनिक जीवन समृद्ध करेल असे प्रतिपादन प्रा.डाॕ.राजेंद्र शेवडे यानी मार्गदर्शन करताना केले.

Read More

शाळकरी अवधूतचा प्रामाणिपणा

वाटेत सापडलेले पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन वैभववाडी प्रतिनिधीरस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट अवधूत विलास राठोड या विद्यार्थ्यांने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी खात्री पटवून सदर पाकीट मालकाला परत केले आहे. अवधूतच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी कौतुक केले.वैभववाडी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस विलास राठोड यांचा सुपुत्र अवधूत राठोड इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. तो वैभववाडी बाजारपेठेत…

Read More

जेष्ठ फोटोग्राफर बापू गोवेकर यांचे निधन

बांदा : बांदा येथील ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीकांत ऊर्फ बापू मधुसूदन गोवेकर (रा. बांदा वय ८७) गुरुवारी सकाळी  राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.      निशा फोटो सुडिओचे ते मालक असून सुमारे ७० वर्षापेक्षा  त्यांनी फोटोग्राफी केली. माजी जिल्हा फोटोग्राफर अध्यक्ष  राजेश गोवेकर व स्वामी बँक पिग्मी एजंन्ट लीना कणबर्गी  यांचे ते वडील.  फोटोग्राफर केदार…

Read More

हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे- प्रा. डॉ. देविदास बोर्डे

⚡मालवण ता.२२-: भारतात हिंदी भाषा जास्त लोक बोलू शकतात, म्हणूनच या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून निवडण्यात आले. हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असे प्रतिपादन पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे प्रा. डॉ. देविदास बोर्डे यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी भाषा दिन सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम गुरुवारी महाविद्यालयात पार पडला….

Read More

जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव

२२ ठिकाणी होणार खाजगीरित्या दुर्गामातेची प्रतिष्ठापणा सिंधुदुर्गनगरी ता.२२-: जिल्ह्यात गणेशोत्सवानतर आता येत्या २६ सप्टेम्बर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे, जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक तर ३२ ठिकाणी खाजगी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक मंडळातर्फे जय्यत तयारी सुरु झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली असून येत्या २६ सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाला…

Read More

जिल्हा परिषद कृषी विभाग करणार ८३ लाख खर्च

२०२२-२३ साठी नियोजन सिंधुदुर्गनागरी ता २२जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ८३ लाख निधीची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून जिल्ह्यातील सुमारे १३६७ हुन अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थींकडून २८ सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.तर २ ऑक्टोबर रोजी प्राप्त प्रस्तावाना मुख्य कार्यकारी…

Read More

राष्ट्रीय कार्यशाळेसाठी २० जणांची निवड

अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांचा समावेश सिंधुदुर्गनागरी ता २१स्वच्छ हरित ग्राम व जल समृध्दी गाव या शाश्वत विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा २२ व २३ सप्टेंबर रोजी पुणे येथे केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या कार्यशाळेला जिल्हा परिषद अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच यांचा समावेश असलेली २० जणांची टीम आज सिंधुदुर्ग…

Read More

वैद्यकीय महाविद्यालयाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा

मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांची वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना पत्र सिंधुदुर्गनागरी ता २२शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग कडील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट, मनमानी व भोंगळ कारभाराची गंभीर दखल घेवून तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मनसे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वैद्यकीय शिक्षण व आयुष्य मंत्रालयाचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ…

Read More

आंबोली पाणलोट समितीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार

अध्यक्ष मयत असताना त्यांच्या करण्यात आल्या स्वाक्षरी;या विरोधात उपोषण करण्याचा शिवसेना तालुका प्रमुख राऊळ यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२२-: आंबोली पाणलोट समिती मध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, अध्यक्ष मयत असताना देखील अध्यक्षांच्या नावाने सह्या झाला असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला असून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुपेश राऊळ आणि या भ्रष्टाचार…

Read More

कणकवली पोलीस ठाण्यातर्फे सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मानपत्र देऊन पोलीस पाटील कासम इब्राहिम शेख ( साकेडी ) व दिलीप गणपत साटम (आयनल) यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहा.पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, पोलीस कॉन्स्टेबल सागर मासाळ आदी उपस्थित होते. गावपातळीवर गावातील…

Read More
You cannot copy content of this page