आधुनिक सुविधांचा वापर जीवन समृध्द करते
प्रा राजेंद्र शेवडे

वैभववाडी संजय शेळके
सोयी सुविधा व विविधता नेहमीच आयुष्याला सर्वश्रेष्ठ ठरवतात. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जलद वापर आणि सर्वश्रेष्ठ मानसिक आत्मविश्वास हेच आधुनिक जीवन समृद्ध करेल असे प्रतिपादन प्रा.डाॕ.राजेंद्र शेवडे यानी मार्गदर्शन करताना केले.

  महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था व रोटरी क्लब वैभववाडी आयोजित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात गुरुवार दिनांक २२/०९/२०२२ रोजी "नाविन्यता व श्रेष्ठ जीवनासाठी क्रीयाशीलता २०३०" या कार्यशाळेत डाॕ. शेवडे बोलत होते, यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डाॕ.सी.एस.काकडे, रोटरी अध्यक्ष श्री संतोष टक्के, रोटरी सचिव श्री संजय रावराणे, उपप्राचार्य प्रा.कांबळे, प्रा.डाॕ.गवळी, श्री विद्याधर सावंत प्रां डाॕ. पैठणे, प्रा.भोसले प्रा.बेटकर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. बुद्धिमत्ता, भावनांचे साधारणीकरण, समतोल जीवनदृष्टी , सांस्कृतिकता व ज्ञानाचा आदर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असे त्यानी सांगितले. पुढील शैक्षणिक धोरणात बदल हे गुणात्मक असून कौशल्य विकास यावर भर असणार आहे हे मत प्राचार्य काकडे यानी मांडले. चांगला विचार नेहमी जीवनाला प्रगल्भ करतो म्हणून तुम्ही ज्ञानात्मक कौशल्यात पारंगत व्हा असे संतोष टक्के यानी मार्गदर्शन करताना सांगितले. प्रास्तविक डाॕ.पैठणे व आभार प्रा.बेटकर यानी मानले.
You cannot copy content of this page