शाळकरी अवधूतचा प्रामाणिपणा

वाटेत सापडलेले पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन

वैभववाडी प्रतिनिधी
रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट अवधूत विलास राठोड या विद्यार्थ्यांने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी खात्री पटवून सदर पाकीट मालकाला परत केले आहे. अवधूतच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी कौतुक केले.
वैभववाडी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस विलास राठोड यांचा सुपुत्र अवधूत राठोड इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. तो वैभववाडी बाजारपेठेत कामानिमित्त आला होता. संभाजी चौकात त्याला रस्त्यात पडलेले पाकीट दिसले. त्यांनी ते पाकीट वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे सुपूर्द केले. सदर पाकिटात दीड हजार रुपये तसेच पॅनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे होती. पोलिसांनी खात्री केल्यानंतर सदर पाकीट अजय रवींद्र कुळये रा. कुसुर यांचे असल्याचे लक्षात आले. ते पैशाचे पाकीट पोलिसांनी अवधूत राठोड याच्या उपस्थितीत कुळये यांच्याकडे सुपूर्द केले आहे. अवधूत यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.

You cannot copy content of this page