कणकवली शहर युवक राष्ट्रवादीने केली मागणी
कणकवली 22 सप्टेंबर (प्रतिनिधी)- कणकवली येथे महाविद्यालयातील मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाई करा अशी मागणी कणकवली शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने कणकवली पोलीस ठाण्यात निवेदन देत करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदलेकर यांच्याशी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. महाविद्यालयाजवळ शालेय मुलींची होणाऱ्या छेडछाडीबाबत व सतत होणाऱ्या वाद विवादाबाबत पोलीस निरीक्षकांना माहिती दिली. यावेळी आपण नक्की योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले.
